जिल्ह्यातील कोरोनाची संख्या सात हजार पार
जिल्ह्यात आज १५७ रुग्णांची वाढ; ३२०८रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही सात हजार पार गेली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १५७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ७०९७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढतच चालली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार आज १५७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात शहरातील १३९ तर १८ रुग्ण हे ग्रामीण भागातील आढळून आले आहेत. यामध्ये ८४ पुरुष व ७३ महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ७०९७ वर गेली आहे. त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर ३१८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सध्या ३२०८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरातील १३९ रुग्ण
शहरात आज १३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात भोईवाडा २, एन-वन दीपनगर १, एन-चार सिडको १, एन-तेरा हडको १, न्यू हनुमाननगर २, एन-सहा, साईनगर-१, गजानननगर १, रामनगर, मुकुंदवाडी १, पवननगर, हडको १, जय भवानीनगर २, विठ्ठलनगर ३, गजानन कॉलनी ६, एन- नऊ सिडको ४, पिसादेवी, गौतमनगर २, अविष्कार कॉलनी १, समतानगर १, सिडको ६, रमानगर २, पदमपुरा ८, क्रांती चौक १, जहागीरदार कॉलनी २, मिल कॉर्नर १, नागेश्वरवाडी ४, मातोश्रीनगर २, पडेगाव १, बायजीपुरा ३, पुंडलिकनगर १, बीड बायपास १, सातारा परिसर १, हर्सुल जेल परिसर १, शिवशंकर कॉलनी ३, घाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतमनगर ३, बड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकरनगर,एन सात २०, सातारा परिसर ४, विष्णूनगर २, न्यू हनुमाननगर १, विजयनगर ११, विशालनगर १, गौतमनगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथनगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १ या भागातील रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागातील १८ रूग्ण
ग्रामीण भागात १८ रुग्ण आढळून आले आहे. त्यात कन्नड १, रांजणगाव, गंगापूर ५, भेंडाळा, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ३, इंदिरानगर, वैजापूर ३, हतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.












